MS Dhoni : गोळ्यांच्या वर्षावासह एमएस धोनीचं चित्रपटात पदार्पण? ‘द चेज’चा रोमांचक टीझर रिलीज! पाहा VIDEO

MS Dhoni ‘The Chase’ Teaser Goes Viral : रविवारी बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्याला त्याने ‘द चेज’ या प्रोजेक्टचा टीझर असल्याचे म्हटले आहे. या टीझरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आर. माधवनसोबत फुल फ्लेज भूमिकेत दिसत आहे. दोघेही टास्क फोर्स ऑफिसरच्या गणवेशात गोळ्यांचा मारा करताना दिसत आहेत.
धमाकेदार टीझर अन् धोनीचा अभिनय चर्चेत –
हा प्रोजेक्ट चित्रपट आहे, वेब सीरिज आहे की अन्य काही, याबाबत माधवनने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टता दिलेली नाही. मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ‘द चेज’च्या टीझरमध्ये आर. माधवन आणि एमएस धोनी यांना जबरदस्त टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. टीझरनुसार, हा एक रोमांचक आणि अॅक्शनने भरलेला शो असणार आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करताना माधवनने लिहिले, “एक मिशन, दोन लढवय्ये. सीट बेल्ट बांधा एक धमाकेदार, जंगली पाठलाग सुरू होतोय! ‘द चेज’चा टीझर रिलीज. दिग्दर्शक वासन बाला लवकरच येत आहे.”
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : भारताचा विजयरथ सुसाट; चीनचा धुव्वा उडवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री!
सोशल मीडियावर व्हायरल, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता –
आर माधवनने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत या प्रोजेक्टबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. हा चित्रपट आहे, वेब सीरिज आहे की जाहिरात, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे. कमेंट सेक्शनमध्ये युजर्स प्रश्नांचा भडीमार करत आहेत. धोनी यापूर्वी अनेक जाहिरातींमध्ये दिसला आहे आणि तमिळ चित्रपट ‘द गोट’मध्ये त्याने स्पेशल अपीयरेंस म्हणून हजेरी लावली होती. मात्र, ‘द चेज’मधील त्याची ही फुल फ्लेज भूमिका त्याच्या अभिनयातील पदार्पणाची चर्चा घडवून आणत आहे.
वासन बाला यांचे दिग्दर्शन –
‘द चेज’चे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले असून, हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, धोनी आणि माधवन यांच्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.





