US Open 2024 : बोपण्णा-एब्डेन जोडीचा विजयी धडाका कायम…

US Open 2024 : भारतीय खेळाडू रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन (Rohan Bopanna-Matthew Ebden) या द्वितीय मानांकित जोडीनेही स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवत तिसरी फेरी (प्री क्वार्टर फायनल) गाठली आहे.
याआधी पहिल्या फेरीत बोपण्णा-एब्डेन या जोडीनं नेदरलँडच्या रॉबिन हासे – सँडर अरेंड्स यांच्या जोडीला एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात बोपण्णा – एब्डेन यांनी दमदार खेळ करताना पहिला सेट 6-3 आणि दुसरा सेट 7-5 असा जिंकला होता.
तिसऱ्या फेरीत बोपण्णा-एब्डेन या जोडीसमोर अर्जेंटिनाच्या मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचे आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी (1 सप्टेंबर) होणार आहे.
US Open 2024 : आणखी एक मोठा उलटफेर, गतविजेत्या स्टार टेनिसपटूला तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का…
दुसरीकडे याच स्पर्धेत आणखी एक भारतीय खेळाडू युकी भांबरी (Yuki Bhambri) आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी (Albano Olivetti) या जोडीनं पहिला सेट गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करत ऑस्टिन क्रॅजिसेक आणि जीन-ज्युलियन रॉजर यांचा 4-6, 6-3, 7-5 असा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे.





