Rohan Bopanna Retirement : रोहन बोपण्णा यांचा २० वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीला निरोप! भावनिक पोस्ट केली शेअर

रोहन बोपण्णांची भावनिक पोस्ट करत
सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये बोपण्णा म्हणाले, “जी गोष्ट तुमच्या आयुष्याला अर्थ देते, तिला निरोप कसा द्यावा? टेनिसमधील २० अविस्मरणीय वर्षांनंतर आता मी अधिकृतपणे माझे रॅकेट खाली ठेवत आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान राहिला आहे.”
❤️❤️❤️ pic.twitter.com/IS3scPrwhW
— Rohan Bopanna (@rohanbopanna) November 1, 2025
ऐतिहासिक कामगिरी –
बोपण्णांनी डबल्स आणि मिश्र दुहेरीत अनेक विक्रम प्रस्थापित केले. २०२४ मध्ये ते सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेते ठरले, तर दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारे सर्वात प्रौढ खेळाडू म्हणून इतिहास रचला. चार वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या बोपण्णांनी २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झासोबत मिश्र दुहेरीत पदकाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.
हेही वाचा – IND vs AUS : अर्शदीपला का दिली जात नाही संधी? गौतम गंभीरच्या संघ निवडीवरून संतापला अश्विन
डेव्हिस कपमधील योगदान –
दीड दशकाहून अधिक काळ भारतीय डेव्हिस कप संघाचा कणा राहिलेल्या बोपण्णांनी मैदानावर आणि बाहेर नेतृत्व व सातत्याचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांच्या निवृत्तीमुळे टेनिस विश्वात मोठी पोकळी निर्माण होत असली तरी त्यांचा यशस्वी प्रवास पुढील पिढीला प्रेरणा देत राहील.





