US Open 2024 : यूएस ओपनमध्ये आणखी एक मोठा उलटफेर, कार्लोस अल्काराझचे दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात….

US Open 2024 (Carlos alcaraz) : यूएस ओपन 2024 मध्ये आणखी एक मोठा उलटफेर दिसून आला आहे. स्पेनचा दिग्गज खेळाडू कार्लोस अल्काराझचे यूएस ओपन 2024 स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले आहे. तत्पूर्वी, विम्बल्डन चॅम्पियन बार्बोरा क्रेजिकोव्हा यूएस ओपनच्या दुसऱ्या फेरीत एलिना-गैब्रिएला रूजेकडून 6-4, 7-5 अशी पराभूत होऊन बाहेर पडली होती.
विशेष म्हणजे जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझला(Carlos Alcaraz) जागतिक क्रमवारीत 74व्या स्थानी असलेल्या डच खेळाडू बोटिक वान डी जैंडस्कल्पने (Botic van de Zandschulp) दोन तास 19 मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन सामन्यानंतर 6-1, 7-5, 6-4 ने पराभूत केले.
विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू याआधी दोनदा भिडले होते. जिथे अल्काराझने दोन्ही वेळा विजय मिळवला होता. पण इथे अल्काराझने चूक केली आणि त्याला पराभवाला सामोरं जावे लागले. याआधी, 2022 मध्ये स्विस इनडोअर बासेल आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते. या दोन्ही प्रसंगी अल्कारोजने बाजी मारली होती.
BOTIC VAN DE ZAND-STUNNER pic.twitter.com/3z1U95zJhP
— US Open Tennis (@usopen) August 30, 2024
33 वर्षांनंतर घडला इतिहास…
नेदरलँड्सच्या बोटिक वान डी जैंडस्कल्पने देखील या विजयासह मोठा इतिहास रचला आणि 1991 नंतर असे करणारा तो पहिला डच खेळाडू ठरला. ज्याने यूएस ओपनमध्ये टॉप 3 क्रंमाकाच्या खेळाडूला पराभूत केले आहे.
2022 मध्ये अल्काराझ बनला होता यूएस ओपन चॅम्पियन …
कार्लोस अल्काराझने 2022 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. गुरुवारी त्याला यूएस ओपनमध्ये बिगरमानांकित बोटिक वान डी जैंडस्कल्पने पराभूत केले. या पराभवामुळे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या अल्काराझची 15 सामन्यांची विजयी मोहीम बोटिक वान डी जैंडस्कल्पनेने रोखली आहे.





