Paris Paralympics 2024 : भारताची दमदार सुरुवात, शूटिंगमध्ये अवनीचा सुवर्णवेध तर मोनानं पटकावलं कांस्य पदक….

Paris Paralympics 2024 (Women’s R2 10m Air Rifle SH1 Final) :पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखाराने चमकदार कामगिरी केली आहे. अवनीने शुक्रवारी (30 ऑगस्ट) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत सुवर्णवेध साधला आहे. अवनीने पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे तर भारताच्या मोना अग्रवालने याच स्पर्धेत कांस्यपदक नावावर केले आहे.
या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ली युनरीने रौप्यपदक पटकावले. अवनी आणि मोना या दोघींनी जिंकलेल्या पदकांसह सध्या सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे. भारताकडे सध्या एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक आहे.
🥇Avani Lekhara
🥉Mona AgarwalHistory has been rewritten at the #ParisParalympics 🇮🇳💥
#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024@mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India @DDNewslive @ParalympicIndia @PCI_IN_Official @DDIndialive @AkashvaniAIR @Media_SAI… pic.twitter.com/KstnjRF6gz
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 30, 2024
अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला…
भारताच्या 22 वर्षीय अवनीने अंतिम फेरीत 249.7 गुण मिळवले, हा पॅरालिम्पिक विक्रम आहे. कांस्यपदक विजेत्या मोनाने 228.7 गुण मिळवले. अवनीने टोकियो पॅरालिम्पिक (2020) मध्येही याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. म्हणजेच तिने आपले विजेतेपदे कायम राखले आहे.
अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 249.6 गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम केला होता. यावेळी तिने 249.7 गुण मिळवून तिचाच पॅरालिम्पिक विक्रम मोडत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्येही कांस्यपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. त्याबरोबरच पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅक टू बॅक गोल्ड मेडल जिंकणारी देखील ती पहिली भारतीय अॅथलीट ठरली आहे.
Olympics Games 2036 : गुणवत्तेला चालना देण्यासाठी ऑलिम्पिक भारतात व्हावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मोनाचा तीन पदक स्पर्धांमध्ये भाग…
भारताची 37 वर्षीय पॅरा नेमबाज मोना अग्रवालने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन पदक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सलग विजयी कामगिरी केल्यानंतर पात्र ठरलेल्या मोनाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. ती आता मिश्रित 50 मीटर रायफल प्रोन R6 स्पर्धा आणि महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन R8 स्पर्धेत भाग घेईल.
तत्पूर्वी, अवनी लेखरा हीने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गेल्या वर्षभरापासून जबरदस्त फॉर्मात असलेली देशबांधव मोना अग्रवालही पाचव्या स्थानावर राहून आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. गतविजेत्या अवनीने 625.8 गुण मिळवले आणि ती इरिना शचेतनिकच्या मागे राहिली. इरिनाने पॅरालिम्पिक पात्रता फेरीत 627.5 गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला.





