Urvil Patel Record : उर्विल पटेलने रचला इतिहास! IPL च्या इतिहासातील ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, पहिल्या ८ चेंडूत लगावले ६ षटकार
Urvil Patel Record : सीएसकेचा युवा आणि धडाकेबाज फलंदाज उर्विल पटेलने एलएसजीविरुद्ध फलंदाजी करताना मैदानात अक्षरशः आग ओकली.

Urvil Patel fastest fifty in IPL history in just 13 balls : आयपीएल २०२६ मध्ये क्रिकेट चाहत्यांना एका ऐतिहासिक खेळीचा थरार अनुभवायला मिळाला आहे. सीएसकेचा युवा आणि धडाकेबाज फलंदाज उर्विल पटेलने एलएसजीविरुद्ध फलंदाजी करताना मैदानात अक्षरशः आग ओकली. उर्विलने अवघ्या १३ चेंडूत ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या झंझावाती खेळीसह त्याने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
एबी डिव्हिलियर्सचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड मोडला
उर्विल पटेलने सामन्याच्या सुरुवातीपासूनच लखनौच्या गोलंदाजांना टार्गेट केले. त्याने आपल्या पहिल्या ८ चेंडूंवर ६ षटकार ठोकून ४१ धावा कुटल्या, जो आयपीएलमधील एक नवा विक्रम आहे. इतकेच नाही तर, टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या १० चेंडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मानही आता उर्विलच्या नावे आहे. त्याने पहिल्या १० चेंडूत ४२ धावा करून दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा ४१ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.
A record knock 🤯
A memorable celebration with a 𝗵𝗲𝗮𝗿𝘁𝗳𝗲𝗹𝘁 𝗺𝗲𝘀𝘀𝗮𝗴𝗲 🥹🫶Urvil Patel, thank you for the entertainment today 💛
Updates ▶️ https://t.co/MoXhlWHk4O#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvLSG | @ChennaiIPL pic.twitter.com/GjR5D2sYid
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतके (चेंडू):
- १३ चेंडू: यशस्वी जायसवाल (२०२३)
- १३ चेंडू: उर्विल पटेल (२०२६)
- १४ चेंडू: केएल राहुल (२०१८)
- १४ चेंडू: पॅट कमिन्स (२०२२)
- १४ चेंडू: रोमारियो शेफर्ड (२०२५)
आयपीएल डावाच्या पहिल्या १० चेंडूंनंतरची सर्वोच्च धावसंख्या
- ४२* – उर्विल पटेल विरुद्ध एलएसजी, चेन्नई, २०२६
- ४१* – एबी डिव्हिलियर्स विरुद्ध एमआय, बंगळूर, २०१५
- ४१* – यशस्वी जैस्वाल विरुद्ध केकेआर, कोलकाता, २०२३
- ४०* – अभिषेक शर्मा विरुद्ध डीसी, दिल्ली, २०२४
- ३९* – रोमारियो शेफर्ड विरुद्ध डीसी, मुंबई, विश्वचषक, २०२४
- ३९* – प्रियांश आर्य विरुद्ध सीएसके, चेन्नई, २०२६
मैदानात षटकारांचा पाऊस –
1️⃣0️⃣0️⃣0️⃣th six of #TATAIPL 2026, courtesy Urvil Patel 🚀
He’s just dealing in maximums today 🔥
Updates ▶️ https://t.co/MoXhlWHk4O#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvLSG | @ChennaiIPL pic.twitter.com/cAtFqSEcqb
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
चेन्नईच्या या युवा फलंदाजाच्या खेळीने चेपॉक स्टेडियमवर एकच जल्लोष पाहायला मिळाला. पहिल्या ८ चेंडूत ४१ धावा आणि १० चेंडूत ४२ धावा करत त्याने अभिषेक शर्मा (४० धावा) आणि प्रियांश आर्य (३९ धावा) यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे. उर्विलच्या या स्फोटक फलंदाजीमुळे लखनौच्या गोलंदाजांची लय पूर्णपणे बिघडली होती. आयपीएल २०२६ मधील ही खेळी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय खेळींपैकी एक ठरली आहे.





