Dewald Brevis Direct Hit : डेवाल्ड ब्रेव्हिसचा ‘रॉकेट थ्रो’! हवेत झेपावत मारला असा ‘थ्रो’ की एडेन मार्क्रमही झाला अवाक्, पाहा VIDEO
Dewald Brevis Direct Hit : डेवाल्ड ब्रेव्हिसने चित्त्याच्या वेगाने चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकर एंडला थेट थ्रो मारला. ब्रेव्हिसचा हा थ्रो इतका अचूक होता की चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि मार्क्रम क्रीजच्या बाहेरच राहिला.

Dewald Brevis Direct Hit Aiden Markram Run Out : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खराब क्षेत्ररक्षण आणि सोपे झेल सुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट सामन्यांच्या निकालांवर पाहिला मिळाला आहे. मात्र, सीएसके आणि एलएसजी यांच्यातील सामन्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. सीएसकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या अफाट चपळतेने मैदानात असा काही चमत्कार केला की, त्याने एडेन मार्क्रमला रन आऊट करून तंबूत धाडलं.
ब्रेव्हिसचा ‘डायरेक्ट हिट’ अन् मार्क्रम गारद –
ही घटना लखनौच्या डावातील १३ व्या षटकात घडली. अक्षत रघुवंशीने डीप मिड विकेटच्या दिशेने फटका मारला आणि एडेन मार्क्रमसोबत दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केल्यानंतर मार्क्रम दुसऱ्या धावेसाठी धावला, पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसने चित्त्याच्या वेगाने चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकर एंडला थेट थ्रो मारला. ब्रेव्हिसचा हा थ्रो इतका अचूक होता की चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि मार्क्रम क्रीजच्या बाहेरच राहिला.
Bullet throw…and the 𝗦𝗧𝗨𝗠𝗣𝗦 𝗟𝗜𝗚𝗛𝗧 𝗨𝗣! 🎯 \|/
🎥 A brilliant bit of fielding from Dewald Brevis stuns Aiden Markram 😮🫡
Updates ▶️ https://t.co/MoXhlWHk4O#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvLSG | @ChennaiIPL pic.twitter.com/20xOXzS07j
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2026
लखनौची मदळी फळी कोलमडली –
एडेन मार्क्रमसाठी हा हंगाम अत्यंत खराब ठरत आहे. गेल्या वर्षी १३ सामन्यात ४४५ धावा कुटणाऱ्या मार्क्रमला यावर्षी ११ सामन्यात केवळ २३१ धावाच करता आल्या आहेत. चेन्नईविरुद्ध तो ७ चेंडूत अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. जॉश इंग्लिसने १७ चेंडूत अर्धशतक ठोकून लखनौला ९१ धावांची विक्रमी पॉवरप्ले सुरुवात करून दिली होती.
पण मार्क्रम, निकोलस पूरन (१) आणि ऋषभ पंत (१५) स्वस्तात बाद झाल्याने लखनऊचा संघ दबावाखाली आला. एका वेळी १४७ धावांवर ६ गडी गमावलेल्या लखनौला शाहबाज अहमद आणि हिम्मत सिंह यांनी सावरत २०३ धावांपर्यंत नेले. लखनौसाठी इंग्लिसने ३३ चेंडूत सर्वाधिक ८५ धावांची वादळी खेळी साकारली.





