उर्वशी रौतेलाचा अनोखा अंदाज; पोपटाच्या डिझाईनच्या पर्सने वेधले सर्वांचे लक्ष; किंमत वाचून व्हाल आवाक्

Cannes Film Festival 2025 | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने मंगळवारी ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025’ मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या सर्व लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उर्वशी रौतेला रंगीबेरंगी ड्रेसमध्ये स्पॉट झाली. सध्या तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उर्वशी रौतेलाने स्ट्रॅपलेस मल्टी कलर डिझायनर गाऊन परिधान केला होता. तिच्या आय मेकअपमुळे तिचा लूक खूप खुलून आला होता. तर तिच्या हातातील पोपटाच्या डिझाईनच्या पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उर्वशी रौतेलाने परिधान केलेल्या फिशटेल-स्टाईल गाऊनची किंमत जवळपास 4,67,500 रुपये आहे.
View this post on Instagram
तर उर्वशीने कॅरी केलेल्या ‘पोपट स्टाइल क्लच’ची किंमत 4.68 लाख रुपये आहे. तिच्या या बॅगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. ‘ती जादूगारासारखी दिसते,’ अशी एक नेटकऱ्याने कमेंट केली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलिकडेच उर्वशी ‘डाकू महाराज’ चित्रपटातील तिच्या ‘दाबीडी दबीडी’ गाण्यातील डान्स स्टेप्स खूप चर्चेत होते. यानंतर ती लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘कसूर 2’ मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी…! लग्नाच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता; अमरावतीत खळबळ





