उर्वशी रौतेलाचा दुबईत सन्मान; व्हिडिओ शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

Urvashi Rautela | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हिंदीसह साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. नुकतंच दुबईत उर्वशीला Fans Favourite Star Actress Award ने सम्मानित करण्यात आले. याबाबत तिने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
उर्वशीने या कार्यक्रमासाठी खास लुक केला होता. तिने सुंदर शिमरी ग्रीन कलरचा गाउन परिधान केला होता. मोकळे केस, हाय हिल्स आणि ग्लॉसी मेकअपमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत होती. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. याशिवाय उर्वशीने पोस्टला खूप खास कॅप्शन दिले आहे. Urvashi Rautela |
View this post on Instagram
“Fans Favourite Star Actress Award मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. बरेच लोक मला विचारतात क मी कधीही कोणाविरुद्ध का बोलत नाही कारण माझ्याकडे तुमच्यासारखे स्ट्राँग, प्रेमळ, निष्ठावंत, प्रामाणिक चाहते आहेत. तुमचा पाठिंबा, आणि तुमचे प्रेम नेहमीच माझ्यासोबत असते. हा पुरस्कार आपल्या नात्याचा पुरावा आहे. मला तुमची आवडती स्टार बनवल्याबद्दल धन्यवाद,” तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
तसंच यंदाही तिने कान्समध्ये आपली जादू दाखवली होती. तिच्या खास लुकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. उर्वशी रौतेला अलिकडेच ‘डाकू महाराज’ या सिनेमात दिसली होती.
हेही वाचा :
Earthquake in Russia | रशियात भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; त्सुनामीचाही धोका





