Urvashi Rautela : ‘मला भीती वाटू लागली आणि….”; उर्वशी रौतेला कुवैतमधून मायदेशी परतली, शेअर केला अनुभव
Urvashi Rautela : उर्वशी सुखरूप मुंबईत परतली आहे. तिने स्वतः कारमध्ये बसून एक व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली.

Urvashi Rautela : इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धदजन्य परिस्थितीमुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. या युद्धाच्या भीषण परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कुवैतमध्ये अडकली होती. मात्र आता ती सुखरूपरित्या मायदेशी परतली आहे.
युद्धाच्या या भीषण परिस्थितीत कुवैतमधून बाहेर पडल्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना अपडेट दिली होती. तसेच तिने भावुक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “जोपर्यंत मी विमानात बसले नव्हते, तोपर्यंत सर्व काही ठीक होते.
पण विमानात बसताच मला अचानक भीती वाटू लागली आणि माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मला माहित नाही का, पण अचानक मी खूप घाबरले होते.”
तिने पुढे लिहिले, “सध्या मला असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे. मला खरोखरच तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. कृपया मला तुमच्या विचारात ठेवा, जेणेकरून माझा प्रवास सुरक्षित होईल. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
जर हे वाचून तुम्हाला चिंता वाटली असेल किंवा मी भावूक वाटत असेल, तर कृपया माफ करा. मी फक्त माझे अनुभव व्यक्त करत आहे. तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याची या वेळी मला खूप गरज आहे.” Urvashi Rautela :
मुंबईत सुरक्षित आगमन
मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी कुवैतमध्ये एका व्यावसायिक कामासाठी गेली होती, त्याच दरम्यान मध्य-पूर्वेतील तणाव वाढला. मात्र, आता उर्वशी सुखरूप मुंबईत परतली आहे. तिने स्वतः कारमध्ये बसून एक व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. Urvashi Rautela
ईशा गुप्ताही होती अडकली
याआधी अभिनेत्री ईशा गुप्ता देखील२८ फेब्रुवारीपासून ती अबू धाबीमध्ये अडकली होती आणि तीही भारतात परतली आहे. मायदेशी परत येताच तिने भारत आणि यूएई सरकारने केलेल्या मदतीसाठी आभार मानले. Urvashi Rautela
हेही वाचा :






