पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. दरम्यान भारताच्या विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तेथील काही सदस्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी काढला असल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट करत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याने एखाद्या खेळाडूच्या गोपनीयतेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.
#ViratKohli | विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल; विनापरवानगी चाहत्याचं कृत्य! पहा व्हिडिओ
एका चाहत्याने विराटच्या संमतीशिवाय त्याच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ बनवल्याबद्दल अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही त्याचा निषेध केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीनेही संताप व्यक्त केला आहे. तिने जगभरातील मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ लीक होण्याच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने विराट कोहलीचा व्हिडिओ इन्स्टास्टोरीवर शेअर करून या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उर्वशीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीच्या हेतूवर संशय देखील व्यक्त केला. तिने लिहिले की, “असाच महिलेच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाला असता तर? अगदी! अनैतिक, अप्रामाणिक कल्पना करा की त्यांनी मुलीच्या खोलीत असेच केले तर.”असे उर्वशीने लिहिले आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ लीक झाल्यानंतर विराट काय म्हणाला
“मला समजते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. त्याचबरोबर चाहते नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करतात. पण या व्हिडिओमध्ये माझ्या वैयक्तिक आणि महत्वाच्या गोष्टींच्या गोपनीयतेची समस्या आहे. जर मी माझ्या हॉटेलच्या रूममध्ये सुरक्षित नाही जिथे माझी वैयक्तिक जागा नाही तर मी कुठे जाऊ? मी या घडलेल्या गोष्टीवर अजिबात अत्यंत नाराज आहे. कृपया लोकांच्या गोपनीयतेची काळजी घ्या आणि याकडे एक मनोरंजनाच्या दृष्टीने पाहू नका.”