Virat Kohli – विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबतीत स्वतः क्रिकेटरने इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओ शेअर करताना विराटने लिहिले की “मला समजते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. त्याचबरोबर चाहते नेहमीच त्यांच्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करतात. पण या व्हिडिओमध्ये माझ्या वैयक्तिक आणि महत्वाच्या गोष्टींच्या गोपनीयतेची समस्या आहे. जर मी माझ्या हॉटेलच्या रूममध्ये सुरक्षित नाही जिथे माझी वैयक्तिक जागा नाही तर मी कुठे जाऊ? मी या घडलेल्या गोष्टीवर अजिबात अत्यंत नाराज आहे. कृपया लोकांच्या गोपनीयतेची काळजी घ्या आणि याकडे एक मनोरंजनाच्या दृष्टीने पाहू नका.”
रोहित अन् विराटच्या ‘त्या’ चुकाच ठरल्या भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण, पॉईंट्स टेबलमध्येही घसरण
एका चाहत्याने विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा विनापरवानगी व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर विराट त्या चाहत्याच्या कृत्यावर अत्यंत नाराज असल्याचे सांगितले. ३० ऑक्टोबरला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकाशी होता. त्यावेळी टीम इंडिया पर्थ येथे हॉटेलमध्ये थांबली होती. याचवेळी विराटच्या रूमचा व्हिडिओ समोर आला.
व्हिडिओमध्ये विराटच्या रूममधील प्रत्येक वस्तू स्पष्टपणे दिसत आहे. रुममध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती हजर असल्याचं समजतं आहे. हे सर्व हॉटेलच्या कर्मचारी किंवा सदस्य असावेत असा अंदाज आहे. व्हिडिओची सुरुवात विराटच्या खोलीतील टेबलापासून होते, जिथे लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती पांढऱ्या कपड्यावर ठेवलेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर विराटचे घड्याळ आणि चष्माही ठेवलेला दिसत आहे. एका बाजूला विराट कोहलीचे कपडे, शूज आणि भारताची जर्सी यांची सुटकेसही दिसत आहे.
View this post on Instagram