WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला, यूपीचा 42 धावांनी केला पराभव…

WPL Live Cricket Score, UPW vs MI Women’s Premier League 2024 : आज दिल्लीत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 14 वा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध 42 धावांनी विजय मिळवला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने मागील सामन्यात यूपीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
They are back to winning ways and HOW! 😎
A clinical 42-run victory for the Mumbai Indians against #UPW 👏👏
Scorecard 💻📱https://t.co/qcJK240qsL#TATAWPL | #UPWvMI | @mipaltan pic.twitter.com/okS2mdzh7v
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 7, 2024
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने यूपीसमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु यूपी संघाला 20 षटकात 9 गडी गमावून 118 धावा करता आल्या. यूपीकडून एकट्या दिप्ती शर्मानं संघर्ष केला पण ती संघाला विजय मिळवू देऊ शकली नाही. दीप्ती शर्मा 36 चेंडूत 53 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. दीप्तीने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. किरण नवगिरे (7), चामारी अटापट्टू (3) आणि ॲलिसा हिली (3) या फलंदाज झटपट पॅव्हेलियनमध्ये परतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात नॅट सायव्हर-ब्रंटच्या 45 धावांची आणि अमेलिया केरच्या 39 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा केल्या. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली आणि 17 धावांत दोन गडी गमावले. हेली मॅथ्यूज चार धावा करून तर यास्तिका भाटिया नऊ धावा करून बाद झाली. त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 59 धावा जोडल्या. नॅट सायव्हर-ब्रंटने 31 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. तीला राजेश्वरीनं क्लीनबोल्ड केलं.
त्यानंतर मुंबई इंडियन्सला चौथा धक्का हरमनप्रीत कौरच्या रूपाने बसला. 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सायमा ठाकूरने त्याला बाद केले. हरमनप्रीतने 30 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. तिला सायमा ठाकूरनं क्लीन बोल्ड केलं. अमनजोत कौर आणि अमेलिया केर यांच्यात पाचव्या विकेटसाठी 13 धावांची भागीदारी झाली. अमनजोत सात धावा करून बाद झाली. तर अमेलियाला 23 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 39 धावा करता आल्या. तिने सजीवन सजनासोबत सहाव्या विकेटसाठी 40 हून अधिक धावांची भागीदारी केली. युपीविरुद्ध 22 धावा केल्यानंतर सजना नाबाद राहिली.
यूपीकडून गोलंदाजीत चमारी अटापट्टूने 4 षटकात 27 धावा देताना सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा आणि सायमा ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





