UPW vs MI W : मुंबईची ‘पलटन’ पुन्हा ढेपाळली! यूपी वॉरियर्सने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्सना लोळवलं; मेग लॅनिंगचा धमाका

UPW vs MI W UP Warriors beat Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये यूपी वॉरियर्सने आपला दबदबा कायम राखत बलाढ्य मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव केला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या ‘डबल हेडर’च्या पहिल्या सामन्यात यूपीने मुंबईला सलग दुसऱ्यांदा धूळ चारली. या विजयासह यूपी वॉरियर्सने स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे.
मेग लॅनिंग आणि लिचफील्डची फटकेबाजी –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने २० षटकांत ८ बाद १८७ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार मेग लॅनिंगने ७० धावांची (११ चौकार, २ षटकार) स्फोटक खेळी केली. तिला फीबी लिचफील्डने ३७ चेंडूत ६१ धावा कुटून मोलाची साथ दिली. हरलीन देओल (२५) आणि क्लोई ट्रायॉन (२१) यांनीही उपयुक्त योगदान दिले. मुंबईसाठी अमेलिया केरने ३ विकेट्स घेतल्या, पण ती धावा रोखण्यात अपयशी ठरली.
प्रत्युत्तरात मुंबईची फलंदाजी ढेपाळली –
🔙 to 🔙 victories! 📈@UPWarriorz with a fantastic all-round show to complete the double over Mumbai Indians 💛
Scorecard ▶️ https://t.co/7bDWCP77Em #TATAWPL | #KhelEmotionKa | #UPWvMI pic.twitter.com/FOoJwFB8EJ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
प्रत्युत्तरात १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेली हेली मॅथ्यूज (१३) आणि सजीवन सजना (१०) स्वस्तात माघारी परतल्या. नॅट सायव्हर-ब्रंट (१५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१८) मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या.
हेही वाचा – टी-२० विश्वचषकासाठी तगड्या संघाची घोषणा! ४२ वर्षीय खेळाडू बनला कर्णधार; जसप्रीतलाही मिळाली संधी
शेवटच्या षटकांत अमेलिया केर (नाबाद ४९) आणि अमनजोत कौर (४१) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सामना मुंबईच्या हातातून निसटला होता. मुंबईचा संघ २० षटकांत ६ बाद १६५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यूपीसाठी शिखा पांडेने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
यूपी वॉरियर्सने सलग दुसऱ्यांदा मुंबईला चारली धूळ –
1⃣1⃣9⃣ runs off 74 deliveries 🙌
Meg Lanning and Phoebe Litchfield smashed #UPW‘s 2️⃣nd highest #TATAWPL partnership 🙇♀️
Updates ▶️ https://t.co/7bDWCP77Em #KhelEmotionKa | #UPWvMI | @UPWarriorz pic.twitter.com/X488427lKC
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 17, 2026
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी (१५ जानेवारी) झालेल्या सामन्यातही यूपी वॉरियर्सने मुंबईला ७ गडी राखून हरवले होते. सलग दोन विजयांसह यूपीने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे, तर मुंबईला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे.





