WPL 2024 : आरसीबीच्या विजेतेपदात ‘या’ 5 खेळाडूंचे योगदान होते महत्त्वाचे…

RCB’s win WPL 2024 : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव करून RCB फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
आरसीबीच्या या विजयात संपूर्ण संघाचे योगदान असले तरी आम्ही तुम्हाला ‘त्या’ पाच खेळाडूंची नावे सांगत आहोत ज्यांनी संपूर्ण हंगामात आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली.
1. एलिस पेरी : पेरीने गेल्या तीन सामन्यांत एकतर्फी कामगिरी केली. फलंदाजी असो वा गोलंदाजी, पेरीने बेंगळुरूसाठी एकटीनं सामने जिंकले. एलिस पेरीने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. तिने या स्पर्धेत एकूण 347 धावा केल्या.
2. ऋचा घोष : ऋचाने आरसीबीसाठी मॅच फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली. गरज असेल तेव्हा त्याने आक्रमक फलंदाजी केली आणि गरज पडेल तेव्हा संयमी खेळही केला. रिचा घोष हिनं 10 सामन्यात 2 अर्धशतकांसह 257 धावा केल्या.
3. सोफी मोलीन्यूक्स : बंगळुरूचा ही अष्टपैलू खेळाडू मोसमातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होती. फलंदाजीत मंधानासोबत तिने गोलंदाजीचीही सलामी दिली. सोफी मोलीन्यूक्स हिनं 10 सामन्यात एकूण 12 फलंदाजांना बाद केलं. तिनं अंतिम सामन्यात 2 विकेट घेतल्या.
4. श्रेयंका पाटील : बंगळुरूची ही अष्टपैलू खेळाडू मोसमात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. अंतिम फेरीत दिल्लीची एकही फलंदाज तिच्यासमोर तग धरू शकली नाही. फिरकीपटू श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 13 बळी घेत पर्पल कॅप जिंकली. तिने अंतिम सामन्यात एकूण 4 बळी घेतले.
5. स्मृती मंधाना : मंधाना ही संघाची सर्वात मोठी आदर्श होती. शानदार नेतृत्वासोबतच तिने खूप धावाही केल्या. मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ती चौथ्या क्रमांकावर होती. मंधाना हिने 10 सामन्यात एकूण 300 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता.










