Bhool Bhulaiyaa 4: ‘भूल भुलैया 4’ चित्रपटाची अपडेट समोर; कार्तिक आर्यन पुन्हा दिसणार का?
Bhool Bhulaiyaa 4 : २०२७ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार

Bhool Bhulaiyaa 4 : ‘भूल भुलैया’ ही बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत ३ भाग आले आहेत. या चित्रपटाच्या नवीन भागाबाबत एक अपडेट समोर येत आहे. चित्रपटाच्या चौथ्या भागासाठी कार्तिक आर्यन आणि निर्माते भूषण कुमार पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कुमार यांनी ‘भूल भुलैया ४’ साठी कार्तिक आर्यनची निवड केली असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात कार्तिक पुन्हा एकदा त्याच्या ‘रुह बाबा’ भूमिकेत दिसणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी क्रिएटिव्ह टीम अनेक गोष्टींवर काम करत आहे. २०२७ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचं सांगितलं जातं आहे. Bhool Bhulaiyaa 4
‘भूल भुलैया’चे तिन्ही भाग हिट
भूल भुलैया १चित्रपटाचा पहिला भाग २००७ मध्ये आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत विद्या बालन, अमिषा पटेल, राजपाल यादव आणि परेश रावल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तर भूल भुलैयाचा दुसरा भाग २०२२ मध्ये रिलीज झाला. Bhool Bhulaiyaa 4
या चित्रपटात कार्तिक आर्यन, तब्बू मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाने २५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.भूल भुलैया ३ हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला. यात कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दिसल्या होत्या. या चित्रपटाने सुमारे २३० कोटींची कमाई केली. आता चित्रपटाच्या पुढच्या भागाकडूनही चाहत्यांना मोठी पेक्षा आहे.
हेही वाचा:
Baramati News : पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर चकाचक…





