Haiwaan First Look: अक्षय कुमार आणि सैफ अली खानचा ‘हैवान’ चित्रपटातील पहिला लुक समोर
Haiwaan First Look: सुपरस्टार मोहनलाल देखील 'हैवान'मध्ये दिसणार

Haiwaan First Look: अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची जोडी 20 वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्यांच्या ‘हैवान’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये दोन्ही कलाकारांची पहिली झलक पाहायला मिळाली.
‘हैवान’ चित्रपटातील अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या लूकचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात अक्षय कुमार काळ्या रंगाच्या पोशाखात, एखाद्या दरोडेखोराप्रमाणे दिसत आहे. जो दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने डोक्यावर काळी टोपी घातली आहे, या टोपीमुळे त्याचे डोळे झाकलेले दिसत आहेत. या पोस्टरवर “बदला सब कुछ देख लेता है” असे लिहिले आहे.
दुसऱ्या पोस्टरमध्ये सैफ अली खान अत्यंत आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजात समोर पाहताना दिसत आहे. आणखी एक पोस्टरमध्ये अक्षय कुमारचे पात्र लाल रंगाच्या थीममध्ये दिसत आहे, तर सैफ अली खानचे पात्र पिवळ्या रंगाच्या छटेत दिसत आहे. हे पोस्टर्स पाहून अंदाज लावता येतो की, चित्रपटाची कथा रहस्य आणि सस्पेन्सने परिपूर्ण असेल.
View this post on Instagram
सुपरस्टार मोहनलाल यांचीही एन्ट्री
विशेष म्हणजे, यात मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल देखील ‘हैवान’चा एक भाग आहेत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुष्टी केली होती की, मोहनलाल या चित्रपटात एका कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत. मोहनलाल यांची प्रत्येक कामगिरी अत्यंत बारकाईने आणि पूर्वतयारीने केलेली असते, असे प्रियदर्शन यांचे मानणे आहे.
हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. ‘हैवान’मध्ये अक्षय कुमार, सैफ अली खानसोबतच बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर हे कलाकार देखील झळकणार आहेत. Haiwaan First Look
हेही वाचा:





