Ind Squad For SA Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (Ind Squad For SA Tour) जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हा दौरा पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा असून, १७ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान सामने खेळले जाणार आहेत. संघाची (Ind Squad For SA Tour) कमान अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली असून, स्टार फलंदाज स्मृती मानधनाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम समतोल साधण्यात आला आहे. विशेषतः युवा अष्टपैलू अनुष्का शर्माला पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे, ही निवड सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. Ind Squad For SA Tour अनुष्का शर्माची प्रभावी WPL कामगिरी मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय अनुष्का शर्माने नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL २०२६) मध्ये गुजरात जायंट्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. सात डावांत तिने १७७ धावा केल्या, त्यात स्ट्राइक रेट १२९.१९ होता. तिचा सर्वोच्च स्कोर ४४ धावा होता. या शानदार फॉर्मचे फळ तिला राष्ट्रीय संघातील निवडीच्या रूपाने मिळाले आहे. अनुष्का मुख्यतः मधल्या फळीत फलंदाजी करते आणि अष्टपैलू क्षमता असल्याने ती संघाला अतिरिक्त पर्याय देऊ शकते. संतुलित फलंदाजी आणि मजबूत गोलंदाजी भारतीय संघाची फलंदाजी अत्यंत संतुलित दिसते. शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि भारती फुलमाळी यांसारख्या आक्रमक फलंदाजांमुळे संघाला भक्कम आधार मिळेल. यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋचा घोष आणि उमा छेत्री सांभाळणार असून, यामुळे संघाला बॅकअप आणि खोली मिळेल. गोलंदाजी विभागात अनुभव आणि युवा जोश यांचा सुंदर मेळ दिसतो. फिरकी गोलंदाजीत श्रेयांका पाटील, श्री चरणी आणि अनुभवी दीप्ती शर्मा यांचे त्रिकूट प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि क्रांती गौड यांच्यावर असेल. काशवी गौतम सारख्या युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. भारतीय महिला संघ (Ind Squad For SA Tour) हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रीचरणी, श्रेयंका पाटील, काशवी गौतम, भारती फुलमाळी, उमा छेत्री (विकेटकीपर), अनुष्का शर्मा. ही मालिका २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. दक्षिण आफ्रिका ही विश्वचषकापूर्वी भारताविरुद्धची शेवटची टी-२० मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे : पहिला टी-२० दिनांक: शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ वेळ: रात्री ९:३० वाजता ठिकाण: डर्बन दुसरा टी-२० दिनांक: रविवार, १९ एप्रिल २०२६ वेळ: संध्याकाळी ५:३० वाजता ठिकाण: डर्बन तिसरा टी-२० दिनांक: बुधवार, २२ एप्रिल २०२६ वेळ: रात्री ९:३० वाजता ठिकाण: जोहान्सबर्ग चौथा टी-२० दिनांक: शनिवार, २५ एप्रिल २०२६ वेळ: रात्री ९:३० वाजता ठिकाण: जोहान्सबर्ग पाचवा टी-२० दिनांक: सोमवार, २७ एप्रिल २०२६ वेळ: संध्याकाळी ५:३० वाजता ठिकाण: बेनोनी