Anushka Sharma : अनुष्का शर्मा करणार कमबॅक? अल्लू अर्जुनसोबत शेअर करणार स्क्रीन
Anushka Sharma : ती लंडनमध्ये राहत असून मुलांचं संगोपन करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र आता ती आठ वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे.

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या मुलांच्या जन्मानंतर तिनं अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला. सध्या ती लंडनमध्ये राहत असून मुलांचं संगोपन करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र आता ती आठ वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे.
अल्लू अर्जुन त्याच्या AA22xA6 या आगामी बिग बजेट चित्रपटातून झळकणार आहे. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून याचे नाव बदललं जाणार आहे. एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. Anushka Sharma
View this post on Instagram
एका वृत्तानुसार दीपिका पादुकोण चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेतून झळकणार आहे. तर यात अनुष्का शर्मा देखील दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट असणार आहे. तर अल्लू अर्जुन आणि अनुष्का पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतील. Anushka Sharma
अनुष्का शेवटची २०१८ मध्ये शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटातून दिसली होती. त्यानंतर ती २०२२ साली आलेल्या ‘काला’ या चित्रपटातील ‘काला’ या गाण्यात झळकली होती. यासह २०२२ मध्येच तिने माजी क्रिकेटर झुलान गोस्वामी यांच्या बायोपिकचं चित्रीकरण पूर्ण केलं. परंतु, अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. यातच आता तिच्या कमबॅकच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा :
Nora Fatehi: नोरा फतेही अडचणीत; वर्क परमिट रद्द करून देशाबाहेर पाठवण्याची मागणी!





