Anushka Sharma : अनुष्का शर्मा पुन्हा स्क्रीनवर; नव्या जाहिरातील लुकने वेधलं लक्ष
अनुष्काच्या (Anushka Sharma) कमबॅकची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यामुळे तिला पुन्हा स्क्रीनवर पाहून चाहतेही खूप आनंदी झाले आहेत. अनुष्का बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहेत. मात्र आता ती एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीत दिसली आहे.

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. सध्या ती पती विराट कोहली आणि तिच्या दोन मुलांसह लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मात्र ती सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे असते. नुकतेच तिने केलेल्या पोस्टमुळे ती जाहिरातीमध्ये दिसणार असल्याचे दिसत आहे.
अनुष्काच्या कमबॅकची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यामुळे तिला पुन्हा स्क्रीनवर पाहून चाहतेही खूप आनंदी झाले आहेत. अनुष्का बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहेत. मात्र आता ती एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीत दिसली आहे. (Anushka Sharma)
तिने या जाहिरातीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यातील तिच्या बदललेल्या लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. (Anushka Sharma)
View this post on Instagram
अनेक नेटकऱ्यांना अनुष्का शर्माचा लूक आधीपेक्षा खूप बदललेला वाटत असल्याचे म्हटलं आहे. तिच्या बदललेल्या रूपामागचं कारण मेकअप, लाईटिंग, वाढतं वय, एडिटिंग किंवा कॉस्मेटिक प्रक्रिया असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. मात्र काहींना तिचा हा लुक पसंतीस पडला आहे.
दरम्यान, अनुष्का शेवटची 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण काम केलं. मात्र काही मतभेदांमुळे हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यानंतर आता अनेक वर्षानंतर ती नव्या जाहिरातीद्वारे प्रेक्षकांच्या समोर आली आहे. (Anushka Sharma)
हेही वाचा:
Jamkhed News: न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्यावर सभापतींनकडून झाडाझडती





