Pro Kabaddi League 2024 : युपी योद्धाजचा मोसमातील पहिला विजय, रोमहर्षक लढतीत दबंग दिल्लीला केलं पराभूत…

Pro Kabaddi League 2024 (UP Yoddhas vs Dabang Delhi KC) – युपी योद्धाजने दबंग दिल्ली संघाला 28-23 असे पराभूत करताना प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पूर्वार्धानंतर हा सामना पूर्णपणे बरोबरीत होता. मात्र, शेवटच्या 10 मिनिटांत यूपी योद्धांनी शानदार वर्चस्व राखले आणि या मोसमातील पहिला विजय नोंदवला.
यूपी योद्धाज़ ने दबंग दिल्ली को चटाई धूल 💪🔥
रोमांचक मुक़ाबले में दर्ज की शानदार जीत 💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #UPYoddhas #DabangDelhiKC pic.twitter.com/uVMMIuXr7F
— ProKabaddi (@ProKabaddi) October 21, 2024
युपी योद्धाजच्या भवानी राजपूतने जबरदस्त चढाया करताना 6 तर 1 बोनसद्वारे असे एकूण 7 गुण मिळविले. शौलकुमारने 5 पकडी करताना भवानी राजपूतला सुरेख साथ दिली. दबंग दिल्लीकडून नवीन कुमार, आशु मलिक व आशिष यांनी प्रत्येकी 4 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.
Pro Kabaddi League 2024 : प्रदीप नरवालच्या संघाचा सलग दुसरा पराभव, रेकॉर्डब्रेक कामगिरी गेली व्यर्थ…
युपी योद्धाजने 13 पकडी करताना विजयाकडे आगेकूच केली. दबंग दिल्ली संघाला केवळ 9 पकडी करता आल्या. सुपर रेडमध्ये दबंग दिल्लीला केवळ एका गुणांची कमाई करता आली. युपी योद्धाजकडून मोहम्मदरेझा कबौद्रहंगी, आशू सिंग व सुमित यांनी प्रत्येकी 2 पकडी केल्या.





