#UP Election 2022: भाजप सरकार केवळ श्रीमंतांसाठीच – अखिलेश
Updated On:

रायबरेली – एबीजी समूहाशी संबंधित बॅंक गैकव्यवहाराच्या संदर्भाने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. गरिबांना कर्ज मिळतच नाही आणि श्रीमंत बॅंकांची लूट करून पळून जातात. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे सरकार हे गरिबांसाठी नसून केवळ श्रीमंतासाठीच आहे, अशी टीका त्यांनी केली.
गरिबांना कर्ज मिळण्यासाठी आपले घर आणि जमीन तारण ठेवायला लागते. मात्र श्रीमंत लोक बॅंकांची लूट करून पळून जातात. या निवडणुकीत भाजपचा पराभव होत आहे. मात्र, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकते. त्यामुळे जनतेने सावध राहायला हवे.
आदित्यनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे 1 कोटी स्मार्टफोन आणि टॅब्लेट उलब्ध झालेले नाहीत. निदान रायबरेलीमध्ये तरी कोणालाही मोफत स्मार्टफोन आणि टॅब्लेट मिळालेले नाहीत, असे अखिलेश यादव म्हणाले.





