पुण्यात IPL KKR संघातील खेळाडूवर करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
Updated On:

पुणे – करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएलमधील के. के. आर. संघाचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चारचाकी वाहनातून विनामास्क जात असल्याने त्याला 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस विनामास्क व्यक्तिंवर कारवाई करत होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून एक व्यक्ती विना मास्क प्रवास करत असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता तो के.के.आर संघातील खेळाडू राहुल त्रिपाठी असल्याचे समजले. करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.





