पंतप्रधानांना पाठविल्या प्रतीकात्मक राख्या ! पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन
Updated On:

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – राखी म्हणजे रक्षण करण्याचे वचन, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांप्रति असलेल्या या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर शासकीय योजना सेलच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी पाठवित केंद्राच्या धोरणा विरोधात अभिनव आंदोलन करण्यात आले.
महागाईचा भस्मासूर नागरिकांवर हल्ला करीत आहे, बेरोजगारीच्या राक्षसाने तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे, इंधन तसेच सिलिंडर दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे, शेतकरी आत्महत्या, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून नागरिकांचा आवाज दाबत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सिटीपोस्टातून पोस्टाद्वारे या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.





