Ramdas Athawale : ‘शरद पवारांनी विधान परिषदेच्या 7 जागा दिल्या, भाजपसोबत 12 वर्षांत एकही नाही’; रामदास आठवलेंची खंत
Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला महायुतीतील मोठ्या पक्षांनी सत्तेत योग्य वाटा द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला महायुतीतील मोठ्या पक्षांनी सत्तेत योग्य वाटा द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विधान परिषदेची किमान एक जागा पक्षाला मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Ramdas Athawale)
शरद पवारांसोबत असताना त्यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा दिल्या होत्या. मात्र, 2014 पासून भाजपसोबत असूनही पक्षाला विधान परिषदेची एकही जागा मिळाली नसल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. (Ramdas Athawale)
आठवले म्हणाले की, महायुतीतील सर्व घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे. पक्षाला सत्तेत वाटा, मंत्रिपद आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. (Ramdas Athawale)
‘आमच्यावर अन्याय होतोय असं नाही, पण सत्तेत वाटा हवा’
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिपब्लिकन पक्षाला पुरेशा जागा मिळत नसल्याचे आठवले यांनी सांगितले. मात्र, याला ‘अन्याय’ असे म्हणत नसल्याचे स्पष्ट करत मोठ्या पक्षांनी सत्तेतील वाटा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (Ramdas Athawale)
‘सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र यावे’
सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आल्यास संघटनेची ताकद वाढेल, असेही आठवले म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार व्यापक राजकीय संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ramdas Athawale)
निवडणूक आयोगाबाबतही भूमिका
मतदार याद्यांमधून काही मतदारांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारींबाबत निवडणूक आयोगाने आवश्यक प्रयत्न करून ती नावे समाविष्ट करावीत, असे आठवले यांनी म्हटले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (Ramdas Athawale)
अभिजित दीपके यांना आठवलेंचा सल्ला
दरम्यान, अभिजित दीपके यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करावा, असा सल्ला आठवले यांनी दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह किंवा शिवराळ भाषा वापरू नये, असेही त्यांनी म्हटले. (Ramdas Athawale)
Ramdas Athawale : ‘ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये’; रामदास आठवलेंचे विधान





