मतदानाची वेळ वाढवून द्या; ठाकरे गटाने ‘या’ कारणामुळे केली मागणी

Maharashtra MLC Election| राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळी 9 वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानुसार आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाची वेळ तासभर वाढवून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.
मुंबईत पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे मतदानाची वेळ तासभर वाढवून द्यावी. या पूर्वी मतदानाची वेळ 9 ते 5 असायची त्याप्रमाणे वेळ वाढवावी अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज भासणार आहे, असे दिसते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज भासणार आहे. या मतांची जुळवाजवळ नेमकी कशी होणार? यात अपक्ष आमदारांचे महत्त्व किती? कोण पडद्याआडून मतदान करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. Maharashtra MLC Election|




