Ramdas Athawale : ‘ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये’; रामदास आठवलेंचे विधान
Ramdas Athawale : कॉक्रोच जनता पार्टीला आठवलेंनी लगावला टोला

Ramdas Athawale : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांचे सहकारी आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, नावे वगळणे व पुन्हा समाविष्ट करणे आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती यांसारख्या निर्णयांवर किमान १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवले होते.
यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR चा मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. याचदरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील 48 तासांत राजीनामा न दिल्यास देशभरात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘कॉक्रोज जनता पार्टीने नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करावं’
यावर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीवर टीका केली आहे. राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टी आहे का? त्यांनी आपल नाव बदलून राजीनामा जनता पार्टी कराव असा खोचक टोलाही रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीला लगावला. याच वेळी आठवले यांनी ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, असेही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हेही वाचा :





