Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर
Amit Shah : भारत फोर्ज लि.च्या मुंढवा कॅम्पसला भेट आणि ६० व्या वर्धापन दिनानिमित्त स्मारक फलकाचे शहा यांच्या हस्ते अनावरण

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार (दि. १५) आणि सोमवारी (दि. १६) पुणे दौऱ्यावर येणार आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरणही शहा यांच्या हस्ते होणार आहे.
भारत फोर्ज लि.च्या मुंढवा कॅम्पसला भेट आणि ६० व्या वर्धापन दिनानिमित्त स्मारक फलकाचे शहा यांच्या हस्ते रविवारी अनावरण होणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (एनएचईसी) बहुराज्यीय सहकारी संस्थेचा भूमिपूजन सोहळा, केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांच्या प्रादेशिक कार्यालयाचे (आभासी) उद्घाटन आणि पुण्यासाठी भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे.
तर, सेनापती बापट मार्गावरील भारतीय जैन संघटना मुख्यालय आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन मुख्यालयाला ते सोमवारी भेट देणार आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.
सदाशिव पेठेतील पेरुगेट येथील भारत इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि आॅनलाइन प्रवेश पोर्टलचे उद्घाटनही शहा यांच्या हस्ते भारत इतिहास संशोधक मंडळातील व्ही. के. राजवाडे हाॅल येथे होणार आहे.





