Satara: राहुल गांधी यांचे आरोप बालिशपणाचे- ना. शिंदे
Satara उपमुख्यमंत्री शिंदे दोन दिवसापासून दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले असून आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळेला पंतप्रधान मोदी यांचे नाव घ्यायचं, तुम्ही कुठल्या एजन्सीचे नाव घेतलं होतं तर समजू शकलो असतो.

Satara: संपूर्ण देशाचा कारभार हाकताना भारताची जगभरात चांगली प्रतिमा नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना राहुल गांधी यांचे फोन टॅपिंगचे आरोप बालिशपणाचे असून मोदींना एवढा वेळ तरी आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
उपमुख्यमंत्री शिंदे दोन दिवसापासून दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले असून आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळेला पंतप्रधान मोदी यांचे नाव घ्यायचं, तुम्ही कुठल्या एजन्सीचे नाव घेतलं होतं तर समजू शकलो असतो. हेडलाईन होतात, ब्रेकिंग न्यूज होतात, मीडियामध्ये एकदम जोरात चालतात म्हणून काही पण आरोप करायचे का ? नरेंद्र मोदी यांच्यावर तुम्ही जेव्हा जेव्हा आरोप केले तेव्हा तेव्हा तुमचा पक्ष खड्ड्यात गेला आहे.
तुम्ही चौकीदार चोर आहे बोलले, त्यांच्या बापावर गेले, त्यांच्या आई वडिलांवर गेले. मोदी यांनी जे काम देशासाठी केले ते तुम्ही बघत नाही. देश एवढा पुढे चाललाय आर्थिक महासत्तेकडे चाललाय त्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान का नाहीये. तुम्ही बोलल्यानंतर पाकिस्तानमध्ये हेडलाईन होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो हे तुमचं देशप्रेम आहे का ? तुमचं राष्ट्रप्रेम आहे का ?’’ विदेशात जाऊन देशाची बदनामी करता. खोटं बोलायचं रेटून बोलायचं ही राहुल गांधी यांची सवय झाली आहे. आणि सवय नाही त्यांना व्यसन झालेलं आहे. त्यामुळे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. 140 कोटी जनता पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर आहे आणि मोदी यांच्यावर तुम्ही जेवढे आरोप कराल, तेवढी 140 कोटी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





