Union Budget 2025: निर्मला सीतारामन मांडणार देशाचा अर्थसंकल्प, तुम्हाला कधी व कुठे पाहता येणार?

Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करणार आहेत. परंपरेनुसार दरवर्षी फेब्रुवारीच्या 1 तारखेला अर्थसंकल्प सादर केला जातो. मोदी सरकार 3.0 चा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर जाईल निर्मला सीतारामन या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पाचे भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल.
या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांना विशेष अपेक्षा आहेत. अनेक महत्त्वाच्या घोषणा, योजना, कर सवलत व विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या जाऊ शकतात. तुम्ही देखील घरबसल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता.
अर्थसंकल्प सादर करतानाचे भाषण कुठे पाहता येईल?
तुम्हाला निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्प सादर करतानाचे भाषण दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या माध्यमातून पाहता येईल. याशिवाय, डीडी नॅशनल आणि संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवरूनही हे भाषण लाईव्ह पाहता येईल.
केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रं कुठे पाहता येतील?
निर्मला सीतारामन यांनी पेपरलेस अर्थसंकल्पाची सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळेचा अर्थसंकल्प देखील पेपरलेस असेल. तुम्हाला Union Budget Mobile App च्या माध्यमातून हिंदी व इंग्रजीमध्ये अर्थसंकल्पाविषयी जाणून घेऊ शकता. तसेच www.indiabudget.gov.in वेबसाइटवर देखील संबंधित माहिती उपलब्ध असणार आहे.
याशिवाय तुम्ही दैनिक प्रभातची वेबसाइट https://www.dainikprabhat.com/ च्या माध्यमातूनही अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा जाणून घेऊ शकता.





