IPL 2025 : रिटायर्ड आऊट vs रिटायर्ड हर्ट; नियम आणि फरक समजून घ्या

IPL 2025 What is the retired out vs retired hurt rule : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत २२ सामने पार पडले असून जवळपास प्रत्येक सामना रोमांचक होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ सीएसके आणि एमआय संघ एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच-पाच सामने खेळले असून दोघांनाही फक्त सामना जिंकता आला आहे. त्यापैकी चार सामन्यात दोन्ही संघांना पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे दोन्ही संघाने आपापल्या खेळाडूंना एका सामन्यात रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज आपण ‘रिटायर्ड आऊट’ म्हणजे काय असतं आणि ‘रिटायर्ड हर्ट’ काय असतं जाणून घेऊया.
रिटायर्ड म्हणजे काय आणि त्याचा नियम काय आहे?
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स एका सामन्यात तिलक वर्माला आणि सीएसकेने डेव्हान कॉनवेला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेटमध्ये ‘रिटायर्ड आऊट’ म्हणजे काय? नियमांनुसार, जर एखादा फलंदाज पंचांच्या परवानगीशिवाय मैदानाबाहेर गेला आणि जर विरोधी संघाचा कर्णधार त्याला परत बोलावण्याची परवानगी देत नसेल तर त्याला ‘रिटायर्ड आऊट’ मानले जाते. फलंदाजीची सरासरी काढताना याला बाद मानले जाते. आयसीसीच्या नियमांनुसार, फलंदाज डावादरम्यान कधीही ‘रिटायर्ड आऊट’ होऊ शकतो.
एकदा एखादा फलंदाज स्वतःच्या इच्छेने ‘रिटायर्ड’ झाला की तो विरोधी कर्णधार परवानगी दिल्याशिवाय सामन्यात आपला डाव पुन्हा सुरू करू शकत नाही. पण जर फलंदाज फलंदाजीला परतला नाही, तर फलंदाजाला ‘रिटायर्ड आऊट’ घोषित केले जाते आणि म्हणून तो रेकॉर्डमध्ये बाद मानला जातो. आता, ‘रिटायर्ड आऊट’ होणे ही खेळात घडणारी एक दुर्मिळ घटना आहे. हा नियम अलिकडेच चर्चेत आला आहे. आणि संघ सामन्याच्या परिस्थितीनुसार, विशेषतः टी-२० सामन्यांमध्ये, त्याचा वापर करत आहेत.
हेही वाचा – KKR vs LSG : शार्दुल ठाकूरने केला लाजिरवाणा विक्रम, एका षटकात ११ चेंडू टाकताना लावली वाईडची रांग
रिटायर्ड हर्ट म्हणजे काय आणि त्याचा नियम काय आहे?
दुखापती हा मैदानी खेळांचा एक भाग आहे आणि क्रिकेटही त्याला अपवाद नाही. फलंदाजांना नेटमध्ये सराव करताना किंवा सामन्यादरम्यान दुखापत होऊ शकते. आता, जर एखाद्या खेळाडूला सरावादरम्यान दुखापत झाली तर तो दुखापतीचे मूल्यांकन केल्यानंतर काही दिवस ब्रेक घेऊ शकतो किंवा विश्रांती घेऊ शकतो. पण जर एखाद्या फलंदाजाला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर त्यानंतरच रिटायर्ड हर्ट नियम लागू होतो. पण रिटायर्ड हर्ट हा शब्द रिटायर्ड आउटपेक्षा वेगळा आहे.
हेही वाचा –PBKS vs CSK : प्रियांश आर्यच्या वादळी शतकाच्या जोरावर पंजाबने मारली बाजी, चेन्नईचा सलग चौथा पराभव





