Ujjwal Nikam: खासदार उज्ज्वल निकम यांनी घेतले भाऊसाहेब रंगारीचे दर्शन
Ujjwal Nikam:
Updated On:

Ujjwal Nikam: गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असतानाही हिंदुस्थानातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी मान्यवरांची गर्दी कायम आहे. बुधवारी खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी मंडळाला भेट देत श्रींची आरती केली.
याशिवाय भाजप आमदार योगेश टिळेकर, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिंहल, गायिका सावनी रवींद्र आणि कार्तिकी गायकवाड, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,
मानाच्या पाचव्या गणपतीचे अध्यक्ष रोहित टिळक, नगरसेविका स्वप्नाली पंडित आणि भाजप प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख नितीन पंडित, अभिनेते प्रणित काळोखे, टेबल टेनिसपटू मुदित दाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रींची आरती केली.





