‘उद्धव ठाकरेंची उतरती दिशा सुरू झाली…’; निलेश राणेंची खोचक शब्दात टीका

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचा राजीनामा यावर देखील भाष्य केलं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले.
यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा याबद्दलही मोठी वक्तव्य केली आहेत. ‘जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं.’ असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
उद्धव ठाकरे तुमची तुमच्या सल्लागारांनी वाट लावली, चांगली लोकं तुम्हाला चालत नाही म्हणून तुमची ही अवस्था. पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद झाली.
ठाकरेंची उतरती दिशा आता सुरू झाली.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 11, 2023
दरम्यान, यासंदर्भात आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून निलेश राणे यांनी सुद्धा ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“उद्धव ठाकरे तुमची तुमच्या सल्लागारांनी वाट लावली. चांगली लोकं तुम्हाला चालत नाही म्हणून तुमची ही अवस्था. पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद झाली’, असे राणे यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ‘ठाकरेंची उतरती दिशा आता सुरू झाली..’, असा असं देखील निलेश राणे म्हणाले आहेत.





