उद्धव ठाकरेंची जहरी टीका,’अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज’

Uddhav Thackeray । आज पुणे येथे पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. असं म्हणत इतिहासाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर सडकून टीका केली.
इतिहासाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले,’शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावले. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतल नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी आले होते. त्यांचे मोहरके आले. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आला होता. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफची केक खाणारी औलाद तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं’ असा घणाघाती ठाकरे यांनी केला .
ते पुढे म्हणाले,’तुम्ही विश्वासघात केला. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असं शंकराचार्य म्हणाले. तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी. तसेच मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केलं. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे, नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहे. त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाचं विचारता. तुमचं काय आहे ते सांगा?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला.
हे वाचले का ? ”माझ्या पायाशी कलिंगड ठेवलंय, पण ढेकणांना आव्हान द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं.”; उद्धव ठाकरेंचा घणाघात





