Uddhav Thackeray On Rahul Narvekar । संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निकालाचं वाचन केलं होत. शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचं, नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. तेव्हा पासून उद्धव ठाकरे सतत राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. । Uddhav Thackeray On Rahul Narvekar दरम्यान, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धाराशिवच्या कळंब येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी “लोकसभा उमेदवारीसाठी राहुल नार्वेकरांनी आमच्याविरोधात निकाल दिला.’ असा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “राहुल नार्वेकर लबाड आहेत… आता भाजपकडून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मी आज आरोपच करतोय. तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात निरोप द्यायला लावलात हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं आहे, तुम्ही म्हणजे त्या लवाद्याने जो निकाल दिलेला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात वाटत नाही काय? हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे.’ असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. । Uddhav Thackeray On Rahul Narvekar निकाल जाहीर करताना ठळक मुद्द्याचं वाचन – । Uddhav Thackeray On Rahul Narvekar विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करताना ठळक मुद्द्याचं वाचन केलं आहे. निकाल जाहीर करताना नार्वेकर म्हणाले आहेत की, ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. निकाल वाचताना ते पुढे म्हणाले, २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. नार्वेकर म्हणाले, माझ्यासमोर आलेल्या पुराव्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शिवसेनेत २१ जून २०२२ पासून दोन गट झाल्याचंसमोर आलं. त्यामुळे पुढील प्रश्नांवर विचार केला. असं ते म्हणाले होते. । Uddhav Thackeray On Rahul Narvekar