Uddhav Thackeray : राम मंदिर तुमची जहागीरदारी नाही; देणगीचोरीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : अयोध्या राम मंदिरात झालेल्या कथित देणगीचोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत बोचरी आणि आक्रमक टीका केली आहे.

Uddhav Thackeray : अयोध्यातील राम मंदिरात देणगीचोरी झाल्याच्या मुद्द्यावरून पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपूरमधील राम मंदिरात पूजा आणि आरती केली आणि रामरक्षा पठण केले. (Uddhav Thackeray)
शहरातील रामनगर भागातील या राम मंदिरात झालेल्या पूजा आणि आरतीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच पक्षाचे खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Uddhav Thackeray)
यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणतात की, ज्यांनी श्रद्धेने पैसे दिले नाहीत ते चोरीला गेले. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, राम मंदीर तुमची जहागिरदारी नाही. आता भाजपा मुक्त राम या आंदोलनाची सुरुवात आहे. (Uddhav Thackeray)
राम भक्तांच्या श्रेद्वेवर हा दरोडा आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते अभी हिंदू मार नही खायेगा, आता हिंदू उनको माफ नही करेगी अशी भुमिका घेतली पाहिजे. तरुणांना न्याय देणे हेच आमचे हिंदू राष्ट्र आहे. भागवत साहेब तुम्ही म्हणाले की, दोन तीन अपत्य जन्माला घाला. (Uddhav Thackeray)
पेपर फुटले ती मुले आपली नाही का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. गद्दारांनांही मला विचारायचे आहे की, तुमच्यात हिंमत आहे तर प्रश्न विचारावा. यांच्यात दम राहिला नाही. हे लाचार आहेत. भाजपने दगाबाजी केली म्हणून महाविकास आघाडी स्थापन केल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी हिंदुत्व सोडले अशी टीका केली. मग तुम्ही का आता सोडले? असा सवाल ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray)
वांगचुक यांच्या समर्थनासाठी आंदोलन करणार
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी आज आंदोलन करणार आहे. मी पहिल आंदोलन करेल आणि त्यांना नंतर दिल्लीत जाऊन भेटेल. सर्व पक्षांना मी उद्याच्या आंदोलनात आमंत्रित करतो. (Uddhav Thackeray)
देशासाठी या आंदोलनात सहभागी व्हा. वांगचुक यांचे आंदोलन हाताळताना केंद्र सरकारने दाखवलेला बेजबाबदारपणा आणि लज्जास्पद वागणूकीवरून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी टीका केली. (Uddhav Thackeray)
रामरक्षा आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी सरकारला नागरिकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे म्हटले. त्यांनी केंद्र सरकारला आंदोलन करणाऱ्या तरुणांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. भाजप सरकारला नागरिकांच्या किंवा तरुणांच्या जीवाची काहीच पर्वा नाही. (Uddhav Thackeray)
जे सरकार नीट सारख्या परीक्षाही योग्य प्रकारे घेऊ शकत नाही, त्या सरकारने हे सांगावे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येण्यापूर्वी आणखी किती तरुणांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागेल, असे ठाकरेंनी म्हटले. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ 2 नेत्यांसाठी थेट पुकारलं युद्ध!






