Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी
Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी (१८ जुलै) अचानक झालेल्या प्रचंड स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत ८ कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला

Factory Blast : गुजरातमधील अहमदाबाद येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत आठ कामगारांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. (Factory Blast)
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या महमूदपुरा भागातील टॅलेंट फायरवर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर कारखान्याला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्यासह बचावकार्य सुरू करण्यात आले. (Factory Blast)
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग लागल्यानंतर काही वेळाने कारखान्यातून सलग मोठे स्फोट झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. (Factory Blast)
जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जखमींवर एल.जी. रुग्णालय, तर इतरांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Factory Blast)

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन अहमदाबादचे महापौर, महापालिका आयुक्त आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का, यासाठी अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. (Factory Blast)
Nagpur Factory Blast : नागपूरमध्ये बर्फाच्या कारखान्यात स्फोट





