Uddhav Thackeray : एकतर्फी कारवाई अन् बेबंदशाही सुरू! नगरसेवकपद रद्द झाल्यावरून उद्धव ठाकरे यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेतील ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाले. यावर आम्ही ती लढाई लढूच, न्यायालयात 8-10 ते 15 वर्षं लागतील असे,ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेतील ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाले. यावर आम्ही ती लढाई लढूच, न्यायालयात 8-10 ते 15 वर्षं लागतील असे,ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (Uddhav Thackeray)
सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांविरोधातील प्रकरणांचे निकाल लागत नाहीत, एकतर्फी कारवाई केली जाते, बेबंदशाही सुरु असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. (Uddhav Thackeray)
ठाकरे म्हणाले, त्यांना विशाखा राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, ती लढाई तर आम्ही लढूच न्यायालयामध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये आठ-दहा वर्ष, 15 वर्ष जातीलच परंतु एका बाजूने आमचे नगरसेवक दणादण बाद करताना त्यांच्यावरती ज्या केसेस आहेत त्याचा निकाल का नाही लागत असा सवाल ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray)
आम्ही जातीची प्रमाणपत्र नाक्यावरच्या दुकानातून घेतलीत आणि त्यांनी फार मोठ्या ठिकाणाहून असे नाहीये. जिथून आम्ही प्रमाणपत्र घेतले तिथूनच त्यांनी घेतले आहेत. आमच्या बाबतीत जर का दणादण निर्णय घेत असाल तर बेबंदशाही सुरु आहे, असे म्हणत ठाकरे यांनी टीका केली. (Uddhav Thackeray)
एकतर्फी कारवाई चाललेली आहे. आमचे नगरसेवक जर तुम्ही बाद ठरवत असाल तर तुमचेही नगरसेवक ज्यांच्यावर आक्षेप आहेत बाद ठरले गेले पाहिजेत, असेही ठाकरे यांनी म्हटले. (Uddhav Thackeray)
तसेच, उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला आणि ते मांडत असलेल्या मुद्यांना पाठिंबा असल्याचे म्हटले. नीट परीक्षेचा गोंधळ झालेला तेव्हा जंतरमंतरवर आंदोलन करणारे अभिजीत दिपके आणि ज्यांना कॉकरोच म्हणून हिणवले गेले त्यांना उघडपणे पाठिंबा देणारा ठाकरेसेना पहिला राजकीय पक्ष असल्याचे ठाकरेंनी यावेळी म्हटले. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! कोर्टाने ‘ती’ महत्वपूर्ण याचिका फेटाळली





