Asia Cup 2025 : आशिया कपसाठी यूएईचा दमदार संघ जाहीर, दोन गेमचेंजर खेळाडूंनी केले पुनरागमन!

UAE Team announced for Asia Cup 2025 : एसीसी आशिया कप 2025 अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 सप्टेंबरला या स्पर्धेचा उद्घाटन सामना खेळवला जाणार आहे. 10 सप्टेंबरला यूएई संघ प्रथमच मैदानात उतरणार असून त्यांचा सामना भारताशी होणार आहे. या स्पर्धेसाठी यूएई संघाची घोषणा झाली असून मुहम्मद वसीमच्या नेतृत्वाखाली दोन खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे. हे दोन्ही खेळाडू सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात.
आशिया कपसाठी यूएई संघाची घोषणा –
मुहम्मद वसीमच्या नेतृत्वाखाली यूएई संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. यूएईचा समावेश गट ‘अ’ मध्ये असून यात भारत, पाकिस्तान आणि ओमान यांचा समावेश आहे. पुनरागमन करणाऱ्या मतीउल्लाह खानने शेवटचा सामना जुलैमध्ये नायजेरियाविरुद्ध खेळला होता, तर सिमरनजीत सिंहने डिसेंबरमध्ये यूएईसाठी शेवटचा सामना खेळला होता. यूएई संघ तब्बल नऊ वर्षांनंतर एशिया कप 2025 मध्ये पुनरागमन करत आहे.
We unveil our DP World Asia Cup 2025 squad!
All the best to Waseem and the boys! 🇦🇪💪
More details: https://t.co/QAbG7OmVuT pic.twitter.com/klvUrDhuFA— UAE Cricket Official (@EmiratesCricket) September 4, 2025
यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये बांगलादेशात एसीसी आशिया कप खेळला होता. यंदा यूएई संघ मजबूत दिसत असला, तरी सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. यूएई संघाला या स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी आहे, पण भारत आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : ऋतुराज गायकवाडची झंझावाती खेळी! वेस्ट झोनची सेमीफायनलमध्ये मजबूत पकड
यूएईचे आशिया कपमधील वेळापत्रक –
- 10 सप्टेंबर 2025: यूएई विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता)
- 15 सप्टेंबर 2025: यूएई विरुद्ध ओमान, झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी (भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:30 वाजता)
- 17 सप्टेंबर 2025: यूएई विरुद्ध पाकिस्तान, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता)
आशिया कप 2025 साठी 17 सदस्यीस यूएई संघ –
मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, अर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पाराशर, एथन डिसूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद जोहैब, राहुल चोपड़ा, रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान.





