U19 Asia Cup 2023 : पाकविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाची जोरदार मुसंडी; नेपाळचा 10 विकेट्सने केला पराभव…

Asia Cup IND U19 Vs NEP U19 Match Result – आशिया करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी भारतीय संघाने नेपाळची वाताहत करत अवघ्या 43 चेंडूत सामना जिंकला. नेपाळचा डाव अवघ्या 52 धावांवर संबूष्टात आणल्यावर भारताने एकही गडी न गमावता 57 धावा करत सामना जिंकला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
भारताचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकत नेपाळला पहिल्यांदा फलंदाजी दिली. नेपाळचा डाव 22.1 षटकांत 52 धावांवर संपला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज राज लिंबानी याने तब्बल 7 फलंदाजांना बाद केले. त्याने 9.1 षटके गोलंदाजी करताना 3 निर्धाव षटके टाकत अवघ्या 13 धावा दिल्या.
त्यानंतर भारतीय संघाने अवघ्या 7.1 षटकांत बिनबाद 57 धावा करत विजय मिळवला. आर्शिन कुलकर्णीने नाबाद 43 धावांची खेळी करताना 30 चेंडूत 1 चौकार व 5 षटकार फटकावले. त्याला अदर्श सिंहने 13 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 13 धावांची खेळी करत सुरेख साथ दिली.
In a resounding victory, India-U19 triumphed over Nepal-U19 by 10 wickets, effortlessly achieving the target, showcasing an outstanding display of skill and dominance on the ground today.#ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/R7pPvdeGxD
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 12, 2023
पाकिस्तान गुणतालिकेत अव्वलस्थानी
आता या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारताचे 3 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण झाले आहेत. भारताचा नेट रन रेट 1.856 असा आहे. तर दुसरीकडे पाकिस्ताननं अफगाणिस्तानविरूध्द सामना जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखलं आहे. त्याचे तीन सामन्यात तीन विजयासह 6 गुण झाले असून नेट रन रेट 1.623 असा आहे. अस असलं, तरीही त्यांच्यासह भारतीय संघही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. भारतीय संघाला केवळ पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, नेपाळवरील विजयानंतर त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहील्या आहेत.
IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी-20 वर पावसाचे ढग, चाहत्यांना निराश करणारं हवामान अपडेट आलं समोर
दरम्यान, भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान अंडर-19 संघाचा पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत अफगाणिस्तानला अवघ्या 173 धावांत गुंडाळले आणि भारतीय संघाने सात विकेट्स राखून ही धावसंख्या गाठली. दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ गडी गमावून 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 47 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.





