Mohsin Naqvi : ‘BCCI ची माफी मागितली नाही आणि कधीच मागणार नाही…’, मोहसिन नक्वींचा भारतीय मीडियावर हल्लाबोल

Mohsin Naqvi’s criticism of Indian media : आशिया करंडक जिंकल्यानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून करंडक स्विकारला नाही. त्यामुळे या प्रकरणातील वाद अजून तीव्र होत आसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये देखील या संदर्भात चर्चा झाली होती. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी, मी बीसीसीआयची माफी मागितली नसल्याचे त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.
मोहसिन नक्वीची भारतीय माध्यमांवर टीका –
एसीसीचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नक्वी यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतीय माध्यमांवर टीका केली. ते म्हणाले, भारतीय माध्यमे ही तथ्यांवर नव्हे तर खोट्या गोष्टींवर टीका करत आहेत. मी काहीही चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट करतो. मी कधीही बीसीसीआयची माफी मागितली नसून मागणार देखील नाही. हा फक्त स्वस्त प्रचार असून याचा उद्देश्य केवळ स्वत:च्या लोकांची दिशाभूल करणे एवढाच आहे. दुर्दैवाने भारताने क्रिकेटमध्ये राजाकारण ओढले असल्याने खेळभावना दुखावली आहे.
मी करंडक देण्यास तयार पण…
Mohsin Naqvi takes a dig at Indian media for spreading false news and clarifies what exactly happened in the ACC meeting yesterday.#Cricket | #Pakistan | #MohsinNaqvi | #Lahore | #AsiaCup2025 pic.twitter.com/TjU2HEcuyK
— Khel Shel (@khelshel) October 1, 2025
आशिया कप जिंकल्यानंतर, भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष देखील आहेत. नक्वी बराच वेळ स्टेजवर उभे राहिले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी ट्रॉफी परत घेतली. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. त्यांनी आपल्या पोस्टमधून एसीसीचा अध्यक्ष म्हणून, त्यादिवशीही मी करंडक देण्यासाठी तयार होतो, आता देखील तयार आहे. त्यांना खरोखरच करंडक हवा असेल तर ते एसीसी कार्यालयात येवून माझ्याहस्ते तो घेवू शकतात, असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आशिया चषकाची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द –
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसीन नक्वी यांनी आशिया चषकाची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली आहे. पण ही ट्रॉफी भारतीय संघाच्या हाती कधी सोपवली जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही .नक्वी यांनी आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेच्या शिष्टचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकित बीसीसीआयकडून राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी सहभाग घेतला होता. या दोघांनी नव्की यांना धारेवर घेतलं.





