Pro Kabaddi 2024 (Match 119) | तमिळ थलैवाजविरूध्द बंगाल वॉरियर्सचा लाजीरवाणा पराभव….

Pro Kabaddi 2024 (Bengal Warriorz vs Tamil Thalaivas) – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 119 व्या सामन्यात तमिळ थलैवाज आणि बंगाल वॉरियर्स आमने-सामने होते. या सामन्यात तमिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सचा 60-29 असा पराभव केला आणि थलैवाजने हा सामना 31 गुणांच्या फरकाने जिंकला.
சும்மா தெறி தெறிக்கவிட்ட #TamilThalaivas🔥❤
எங்கப்பா ஒளிச்சு வச்சு இருந்திங்க இந்த ஆட்டத்தை 🥹#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz pic.twitter.com/pFTw0QtnlO
— ProKabaddi (@ProKabaddi) December 18, 2024
दरम्यान, दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असून यादरम्यान बंगालला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. थलैवाज गुणतालिकेत 9व्या आणि वॉरियर्स 10व्या स्थानावर आहेत.
Pro Kabaddi 2024 (Match 118) | बेंगळुरू बुल्सची लाजिरवाणी कामगिरी कायम…
मायटी मनीने 12 व्या मिनिटाला त्याचे खाते उघडले आणि प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये 100 रेड पॉइंट देखील पूर्ण केले. मात्र, या सामन्यात तो फ्लॉप झाला आणि 7 रेड्स (छापा) मध्ये केवळ एकच गुण मिळवू शकला. तो 5 वेळा बाद झाला आणि दुसऱ्या हाफमध्ये त्याला सब्स्टीट्यूट करण्यात आले. थलैवाजसाठी मोईन आणि हिमांशूने सर्वाधिक 13-13 गुण घेतले. नितेशने डिफेंसमध्ये (बचाव) 7 गुण घेतले.





