Pro Kabaddi 2024 (Match 108) | यूपी वॉरियर्स विरूध्द बंगाल वॉरियर्स लढत बरोबरीत….

Pro Kabaddi 2024 (UP Yoddhas vs Bengal Warriorz) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 108 वा सामना यूपी वॉरियर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात पार पडला. हा सामना खूपच रोमांचक झाला. सामन्याच्या शेवटच्या रेडमध्ये (चढाई) दोन्ही संघांनी कोणताही धोका पत्करला नाही आणि सामना 31-31 असा बरोबरीत राहिला. यासह योद्धा 59 गुणांसह चौथ्या स्थानावर तर बंगाल संघ 40 गुणांसह 9व्या स्थानावर आहे.
Tie number 1️⃣1️⃣ in PKL 1️⃣1️⃣ 🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #UPYoddhas #BengalWarriorz pic.twitter.com/ZaAQhXxRcB
— ProKabaddi (@ProKabaddi) December 12, 2024
प्रो कबड्डी लीगच्या या सामन्यात, गगनने रेडिंगमध्ये (चढाई) सर्वाधिक 11 रेड पॉईंट्स घेतले आणि हितेशने यूपी योद्धांच्या बचावात 6 टॅकल पॉइंट घेतले. बंगाल वॉरियर्सच्या रेडिंगमध्ये, पी राणेने 10 रेड पॉइंट घेतले आणि नितीश कुमारने 5 टॅकल पॉइंट घेतले. मनिंदर सिंग वाईटरित्या फ्लॉप झाला आणि त्याला केवळ एक गुण मिळवता आला.
Pro Kabaddi 2024 (Match 107) | दिल्ली संघ ठरला ‘दबंग’, रोमहर्षक लढतीत टायटन्सचा केला पराभव…
दुसरीकडे पहिल्या सामन्यात म्हणजेच प्रो कबड्डी लीग 2024 च्या 107 व्या सामन्यात, दबंग दिल्ली KC ने तेलुगू टायटन्सचा 33-27 असा पराभव करून शानदार विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे 61 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. टायटन्स 55 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पीकेएलमध्ये टायटन्स दिल्लीला पराभूत करण्यात अपयशी ठरलेला हा सलग सहावा हंगाम (7 वर्षे) आहे.





