Pune News : मंगळवार पेठेत सीमा भिंत कोसळून दोन रिक्षांचे नुकसान, जीवितहानी टळली
Pune News : कसबा अग्निशमन केंद्रातील रात्रपाळीतील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल

Pune News : पुण्यातील मंगळवार पेठेतील सुशीला सोसायटी येथे आज सकाळी ६.५७ च्या सुमारास सीमा भिंतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली.
ही भिंत खाली उभ्या असलेल्या दोन रिक्षांवर पडल्याने रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताच्या वेळी तिथे कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. Pune News

Pune News : मंगळवार पेठेत सीमा भिंत कोसळून दोन रिक्षांचे नुकसान, जीवितहानी टळली
या घटनेची माहिती मिळताच कसबा अग्निशमन केंद्रातील रात्रपाळीतील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालक वाघमारे, फायरमन दत्तात्रेय सहाने तसेच मदतनीस लोखंडे आणि खांडरे यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले.
अडकलेल्या दोन्ही रिक्षा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या असून, प्रशासनाने पुढील खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. Pune News
हेही वाचा:





