हॉटेलमध्ये दोन महिने मुक्काम; बुडवले साडे तीन लाख

पुणे – हॉटेलमध्ये तब्बल सव्वा दोन महिणे मुक्काम ठोकल्यानंतर 3 लाख 36 हजाराचे बील बुडवण्यात आले. याप्रकरणी दोन महिलांसह दुबईतील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल चिपकर (रा.दुबई) आणि बाणेर व कोथरुड येथे रहाणाऱ्या दोन महिलांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अक्षय संजय चतुर्वेदी(30,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनूसार विशालने दुबईवरुन वेबसाईटच्या माध्यमातून नगर रोड येथील हॉटेल फोर पॉंईंटमध्ये एक खोली बुक केली होती. या खोलीची मुदत त्याने वारंवार वाढवून घेतली. या खोलीमध्ये दोन महिला 1 जूलै ते 7 सप्टेंबर दरम्यान राहिल्या होत्या.
त्याने 4 लाख 36 हजार रुपये बिलापैकी 90 हजार रुपये ऑन लाईन पध्दतीने दिले होते. उरलेले 3 लाख 36 हजार रुपये दिले नाहीत. या महिला 7 सप्टेंबरला अचानकपणे हॉटेल प्रशासनाला कोणतीही माहिती न देता निघून गेल्या. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.





