Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, द्रौपदी मूर्मू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. राजकारणावर आणि प्रशासणावर पकड असणारे, रोखठोक तितकेच दिलदार असणाऱ्या अजित दादांचा आदरयुक्त दराराही तितकाच होता. अलीकडेच अजित पवारांनी एका भाषणात लोकांना सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. राजकारण लय वंगाळ, राजकारणात पडू नका Ajit Pawar Death Breathing Stopped Plane Crash Mourning अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण येथील जाहीर सभेत लोकांना सल्ला दिला होता की, “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा, असा सल्ला अजित दादांनी दिला होता. साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले पुढे बोलताना म्हणाले होते, काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही” साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे अजित दादा म्हणाले होते. दादांनी आयुष्य नीट जगा असा सल्ला दिला होता. दादांच्या निधनानंतर तो सल्ला चर्चेत आला आहे.