घोरपडी परिसरात खूनाच्या प्रयत्नाच्या दोन घटना समोर; गुन्हे दाखल

पुणे – शहरातील तळजाई वसाहत, घोरपडी परिसरात खूनाच्या प्रयत्नाच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर, आणि मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाच जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका तरुणाला कोयता व स्टंम्पने मारहाण करत खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी शैलेश महादेव पवार (वय.25,रा. तळजाई वसाहत पद्मावती) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका सराईत गुन्हेगारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य तीघे फरार आहेत. सोनु शिंदे, अनिकेत उर्फ अशु कांबळे, आदित्य उर्फ शेंड्या ढाकले, सोन्या ढाकले, विनायक गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात घडली.
दहशत निर्माम करण्याच्या उद्देशाने टोळक्याने तरुणाला रस्त्यात अडवले. त्यानंतर कोयता व लाकडी स्टंम्पने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार करण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पठाण करीत आहेत.





