Nepal Helicopter : नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची धडक; भारतीय प्रवाशाचा मृत्यू
फेलिचे भागातल्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये मंगळवारी ही दुर्घटना घडली. लॅन्डींग होत असताना या दोन हेलिकॉप्टरची धडक झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nepal Helicopter – नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची धडक झाल्यामुळे एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक अन्य व्यक्ती जखमी झाला. नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यातील खुंबू पासांग ल्हामू ग्रामीण नगरपालिकेत.
फेलिचे भागातल्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये मंगळवारी ही दुर्घटना घडली. लॅन्डींग होत असताना या दोन हेलिकॉप्टरची धडक झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही हेलिकॉप्टर फिशतायल एअर आणि एअर डायनेस्टी कंपन्यांची होती. दोन्ही हेलिकॉप्टरनी माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पजवळच्या लुकला विमानतळावरून उड्डाण केले होते. या अपघातात वसंत कुमार बालारामामारामाडू या भारतीय प्रवाशाचा मृत्यू झाला.
तर शैलेश कृष्ण पटेल या मूळ भारतीय आणि न्यूझीलंडचे नागरिक असलेले आणखी एकजण जखमी झाले आहेत. त्यांना दुसऱ्या हेलिकॉप्टरने काठमांडूमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिक देखील जखमी झाले असून त्यांना देखील काठमांडूला हलवण्यात आले आहे.





