श्री विघ्नहर कारखान्याच्या निवडणुकीत दोन गटांत चुरस; ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात

ओझर : देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर/आंबेगाव संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट आणि ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गटात निवडणूक होणार आहे. या ४ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
बिनविरोध निवडणुकीची शक्यता फोल
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ६१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गटात उमेदवार रहेमान अब्बास मोमीन इनामदार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार
ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गटातील ३ जागांसाठी खालील उमेदवार निवडणूक लढवत आहेत :
1. रहेमान अब्बास मोमीन इनामदार
2. संतोष बबन खैरे
3. सुधीर महादू खोकराळे
4. विद्यमान चेअरमन सत्यशील सोपान शेरकर
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील १ जागेसाठी खालील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत :
1. रहेमान अब्बास मोमीन इनामदार
2. निलेश नामदेव भुजबळ
3. सुरेश भिमाजी गडगे
मतदान आणि मतमोजणी
• मतदान – १५ मार्च २०२५
• मतमोजणी – १६ मार्च २०२५
या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.





