श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २१ पैकी १७ जागांवर विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचे उमेदवार बिनविरोध

ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक सन २०२५-२०३० निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज माघारीनंतर संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध होऊन ४ जागांसाठी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शिरोली बुद्रुक गटातील ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघातील ३ जागांसाठी ४ उमेदवार व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कारखान्याची निवडणूक जरी लागली असली तरी विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचीच निर्विवाद सत्ता आली आहे. शिरोली बुद्रुक गट व इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातील निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र साखर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी अंबादास हांडे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, संभाजी पोखरकर, सविता शिंदे आदी १५ जणांनी सर्वांनी माघार घेतली असल्याचे प्रमोद खांडगे यांनी सांगितले.
अन्य मतदार संघातील बिनविरोध निवडून आलेले उमेदवार –
-उत्पादक सभासद प्रतिनिधी -जुन्नर गट १ (३ जागा) -अशोक घोलप, अविनाश पुंडे, देवेंद्र खिलारी,
-उत्पादक सभासद प्रतिनिधी-ओतूर गट ३ (४ जागा) – धनंजय डुंबरे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर.
-उत्पादक सभासद प्रतिनिधी पिंपळवंडी गट ४ (३ जागा) – विवेक काकडे, विलास दांगट, प्रकाश जाधव.
-उत्पादक सभासद प्रतिनिधी घोडेगाव गट ५ (३ जागा) – यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रय थोरात.
-अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- (१ जागा) – प्रकाश सरोगदे.
-भटक्या-विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी- (१ जागा) – संजय खेडकर.
-महिला राखीव प्रतिनिधी (२ जागा)- नीलम तांबे ,पल्लवी डोके
दरम्यान विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह संतोष खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, देवेंद्र खिलारी, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संधी मिळाली आहे. तर अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे हे नवीन चेहरे आहेत.





